आठवड्याचे वार
सात (का बुवा?). प्रत्येक वाराबद्दल भारतीय समाजमनात अनेक समज / रूढी प्रचलित आहेत. सदर लेखात अश्या समजुतींचा संग्रह करण्याचा प्रयत्न आहे.
- मंगळवारी नवीन कपडे घालू नयेत.
- देणी द्यायची असतील अथवा पैसे उधार । कर्जाऊ द्यायचे असतील तर ते मंगळवारी द्यावेत.
- बुधवारी माहेराहून सासरी जाऊ नये.
- बुधवारी नवीन कपडे घ्यावेत अथवा परीधान करावेत.
- शुक्रवारी पैसे देऊ नयेत. वसुली करावी. पैसे कर्जाऊ घ्यायचे असले तरी अवश्य घ्यावेत.
- शनीवारी नखं काढू नयेत. तेल, लोखंडाच्या वस्तु, चपला विकत घेऊ नये.
- रविवारी वास्तुशांती करु नये. (रविवारी वास्तुशांतीचे मुहुर्त मी आजपर्यंत पाहिले नाहियेत).
- ज्यांच्या घरी गाई-म्हशी असतील त्यांनी आठवड्यातील एक दिवस दूध पिऊ नये. (अर्थातच तान्ह्या मुलांचा अपवाद!)
बोर झालं नसेल तर अजून वाचा: समज - गैरसमज: भाग पहिला
टीप:
यातील
समज / रूढींशी मी सहमत आहे असे मुळीच नसून केवळ त्यांची कुठेतरी नोंद असावी एवढाच
विचार या मागे आहे.
No comments:
Post a Comment