शिव-चरीत्रांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपति आणि रणजित देसाई यांची श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरी यांचं स्थान अजोड आहे.
(वास्तविक, लेखाची सुरूवात "शिवाजी राजांवर अनेक उत्तमोत्तम पुस्तके लिहीली गेली असली तरी-" अशी करणार होतो, पण या दोन पुस्तकांशिवाय तिसरं नावंच आठवेना!)
"राजा शिवछत्रपति" पहिल्यांदा वाचलं तेव्हा ते एक-खंडी जाडजूड पुस्तक होतं, टाईप पण छोटा. वाचून वाचून हाताला रग लागली कि मी त्यातील सुंदर-सुंदर चित्रं रंगवायला लागायचो. (लायब्ररीचं पुस्तक असूनही, किंबहुना त्यामुळेच!)
सर्वजण श्रीराम-श्रीकृष्ण यांच्या जोडीला शिवाजी महाराजांचं नाव घेत असल्याने मी शिवाजीला ही निळ्या रंगात रंगवायचो. चित्र रंगवून झाल्यावर त्याखाली "Gautam Soman, Std VI Div A" अशी लफ़्फ़ेदार सही करत असे. या ऊपद्व्यापाबद्द्ल नंतर लायब्ररीयनने झापल्यावर मी तिचं "खत्रुड साहिबा" असं नामकरणही केलं होतं.
सर्वजण श्रीराम-श्रीकृष्ण यांच्या जोडीला शिवाजी महाराजांचं नाव घेत असल्याने मी शिवाजीला ही निळ्या रंगात रंगवायचो. चित्र रंगवून झाल्यावर त्याखाली "Gautam Soman, Std VI Div A" अशी लफ़्फ़ेदार सही करत असे. या ऊपद्व्यापाबद्द्ल नंतर लायब्ररीयनने झापल्यावर मी तिचं "खत्रुड साहिबा" असं नामकरणही केलं होतं.
"श्रीमान योगी"तील पल्लेदार वाक्यांनी आणि त्यातील वातावरण-निर्मीतीने प्रचंड प्रभाव पाडला. मी घरी दिवसभर कंबरेला टोवेल गुंडाळून त्यात कपडे वाळत घालायची काठी तलवारीच्या रूबाबात खोचून फिरत असे. जिरेटोप न सापडल्याने, "दिल है की मानता नही" मध्ये आमिर खान घालतो तशी, प्लास्टिक क्याप डोक्याला घालत असे. आईला "मासाहेब" व धाकटा भाऊ सौरभला "शंभूराजे"(!) म्हणून कावून सोडलं होतं. (बाबांना मात्र "बाबा" म्हणत होतो).
आमच्याकडे तेव्हा कुत्रा नव्हता, म्हणून घरच्या बोक्याचे नामकरण "वाघ्या" झाले होते. रोजचे संवाद सुद्धा "मासाहेब, आम्हास अजून भात वाढा", किंवा, "शंभूराजे, DD2 च्यानल लावा" अशा तर्हेने चालत.
फक्त एका गोष्टीची कमी होती, ती म्हणजे महाराजांसारखी भरघोस दाढी, कारण महाराजांना तशी दाढी लहानपणापासूनच होती अशी माझी पक्की समजूत होती.
हा सर्व प्रकार साधारण महिनाभर चालला, त्यानंतर आमची वार्षिक परीक्षा सुरू झाली, व महाराजांना आपले लक्ष राज्यकारभारातून काढून घेऊन algebraic equations मध्ये गुंतवावे लागले.
नंतरची जवळपास दोन दशके अशीच गेली.
दोन महिन्यांपुर्वी "राजा शिवछत्रपति" ची दोन-खंडी १७वी आवृत्ती घरी आली. पुस्तक वाचून तर कधीचेच झालेय, चित्रें मात्र अद्याप रंगवायची बाकी आहेत...
2 comments:
very cute....
nice story..
STC Technologies
Post a Comment