मित्रहो,पुण्यातल्या पी. एम टी. बसेस बद्दल भरपूर बोलले, लिहिले जाते... थोडेसे चांगले, बरेचसे वाईट. तरीही लोकं पी. एम टी. ने प्रवास करणं काही सोडत नाहीत. आतापर्यंत मला वाटायचे कि ते नाईलाजापोटी असावे. परंतु काही क्षणांपुर्वीच मला पी. एम टी. प्रवासाचे फ़ायदे ऊमगले, आणि ’जे जे आपणांसी ठावे...’ या ऊक्तीनुसार मी ते आपल्याला सांगत आहे.
१. पी. एम टी. चे चालक आपली गाडी प्रकाश वेगाने हाकायचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिध्दांतानुसार, प्रकाश वेगाने जाणाय़ा वस्तुसाठी कालगणना थांबते. याचाच अर्थ - तुम्ही पी. एम टी. ने जितका प्रवास कराल तेवढे तुमचे आयुष्य वाढेल.
२. पुण्यात पी. एम टी. शिवाय प्रवासाचे दुसरे साधन म्हणजे रिक्षा अथवा स्वत:ची बाईक. समजा तुम्ही यापैकी एकाने चालला आहात आणि (देव करो, असे न होवो, पण) पी. एम टी. ने धडकले. जास्त मार कोणाला बसेल? ( या कूट-प्रश्नाचे ऊत्तर पडताळून पहाण्यासाठीच पी. एम टी. चालक वारंवार प्रयोग करत असतात).बहुसंख्य जन्तेच्या असे ध्यानात आले आहे की आपण पी. एम टी. च्या आतच जास्त सुरक्षित राहु.
३.पी. एम टी. जीवन-शिक्षण देते. काही कारण नसताना भांडण कसे ऊकरून काढावे, चालत्या गाडीत मारामारी कशी करावी, हे रोजच्या जीवनात ऊपयोगी पडणारे शिक्षण पी. एम टी. त मिळते.
४. पी. एम टी. भाषा-शिक्षण देते. कमीत कमी शब्दांत दुसयाचा अपमान कसा करावा, नव-नवीन म्हणी व वाक्प्रचार आपल्याला पी. एम टी. त शिकायला मिळतात.
५. पायाच्या एका बोटावर उभे राहू शकता? एका बोटाने वरच्या हॆन्डल-बारला लोंबकळु शकता? योगासनांचे हे नवीन प्रकार शिकण्यास पी. एम टी. नेच प्रवास केला पाहिजे.
६. गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे, " तू फ़क्त कर्म कर... फ़लाची अपेक्षा धरू नकोस.." त्याचप्रमाणे पी. एम टी. त बसणे एवढेच आपल्या हातात असते. इच्छित स्थळी सुखरूप पोहोचू की नाही, पोहोचल्यास वेळेवर पोहोचू की नाही यासारख्या क्षुद्र प्रश्नांचा भार त्या "चक्र-धरा"वर टाकून निवांत व्हावे. दुसरे म्हणजे, पी. एम टी. त बसलेला मनुष्य-प्राणी पुढील बरेच तास काहीच काम करु शकत नाही. एकुण काय तर, पी. एम टी. "निष्काम कर्मयोग आचरणात आणण्यास भाग पाडते.
७. पी. एम टी. त बसल्या-बसल्या तुम्हाला जगभरातील सर्व समस्यांची ऊत्तरे विनासायास मिळतात. अगदी... डासांपासून संरक्षण कसे करावे, इथपासून ते "नासा"त निवड व्हायला काय करावे, इथपर्यंत.
८. पी. एम टी. मधील सीट्सच्या मागे लिहिलेला मजकूर आपले सामान्य-न्यान वाढवितो. अन्यथा, रामाचे रेणुकावर कसे आणि किती प्रेम आहे, अमर नावाचा कुणीतरी "बैल" आहे, ही माहिती आपल्याला कुठल्या पुस्तकात भेटली असती?
९. पी. एम टी. त बसून खाच-खळग्यांनी भरलेल्या कर्वे रोडवरून अंगचे एकही हाड खिळखिळे न होता प्रवास करू शकणे, ही डब्ल्यु. डब्ल्यु. एफ़. कुस्ती-स्पर्धेत भाग घेण्यासाठीची पात्रता फ़ेरी मानली जाते ( किंवा मानली जायला हरकत नाही).
१०. पी. एम टी. त अगदी घरगुती वातावरण असते. चालक-वाहक-प्यासिंजर आपुलकीने एकमेकांच्या तीर्थरूपांची चौकशी करतात. प्रेमात येऊन गालांवर चापट मारणे वगैरे प्रकार अगदी खेळीमेळीत चालू असतात.
तर, वाचकहो! अशी ही आमची पी. एम टी..... आम्ही पुणेकर त्यातून प्रवास करतो, कारण कुणीच नाही प्रवास केला तर पी. एम टी. चालणार कशी? पी. एम टी. नाही चालली तर अपघात होणार कसे? अपघातच नाही झाले तर पेपरवाले रोज उठून छापणार तरी काय? आम्ही चहा पिता-पिता वाचणार काय? आणि तावातावाने चर्चा करणार तरी कशावर??
(२ जून २००६)
Friday, April 25, 2008
Thursday, April 24, 2008
गांधीहत्या आणि मी
गांधीहत्या आणि मी
-गोपाळ वि. गोडसे
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाल्यावर या कटातील आरोपी पकडले जाऊन त्यापैकी नथूराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी देण्यात आले, तर इतर तिघांना जन्मठेप झाली. गांधी-हत्येविरूध्दचा लोकक्षोभ इतका तीव्र होता की नथूरामने आपली बाजू न्यायालयात नि:संदिग्ध शब्दांत मांडूनही त्याला माथेफिरू ठरविण्यात आले. नथूरामचे बंधू व या कटातील एक आरोपी गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय हा आहे की गांधी-हत्त्या हे भावनेच्या भरात, परीणाम न पाहता केलेले आततायी कृत्य नसून ती थंड डोक्याने योजिलेली राजकीय हत्त्या होती.
प्रस्तुत ग्रंथात, पकडले गेल्यानंतरचे आरोपींचे वर्तन, त्यांच्यावरील अभियोग, गोडसे-आपटे यांची फाशी, उर्वरीतांची जन्मठेप व त्यांचे कौटूंबिक जीवन याचा सविस्तर आलेख मांडला आहे. अर्धा डझन छायाचित्रें पुस्तकाला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देतात.
गांधी-हत्त्येची ही दूसरी बाजू जिज्ञासूंनी जरूर वाचावी.
(१८ मे २०००)

Labels:
पुस्तक
गंधाली
गंधाली
-रणजित देसाई
"स्वामी"कार रणजित देसाई यांचा हा ऐतिहासिक कथा-संग्रह. या "विराणी", "असा रंगला विडा", "अशी छेडिली तार", "अशी रंगली प्रीत" व "नक्षत्रकथा" या पाच कथा आहेत. पैकी, "विराणी" (सलीम-नूरजहान) व "अशी रंगली प्रीत"(बाजीराव-मस्तानी) या निखळ प्रेमकथा असून इतर कथांनाही प्रेमभावनेची तरल किनार आहे.
त्या-त्या ऐतिहासिक काळात चपखल बसणारी शब्दरचना, केवळ शब्दांनी व्यक्तीचित्र साकार करण्याची हातोटी व भावपूर्ण प्रसंग यामूळे वाचकाला आपण त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदारच आहोत असे वाटत राहते. टिपून ठेवावेत असे संवाद तर पानो-पानी आहेत.
ऐतिहासिक कथांची आवड असणाया वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे पंचपक्वान्नांची मेजवानीच आहे.
(१३ ऒगष्ट २०००)

पुस्तक,
रणजित देसाई
Wednesday, April 23, 2008
माझी जन्मठेप
माझी जन्मठेप
-विनायक दामोदर सावरकर
सन १९१०-१९११ मध्ये विनायक दामोदर सावरकरांवर दोन खटले चालून त्यांना दोन "जन्मठेप काळे पाणी"च्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचाच अर्थ अंदमानात ५० वर्षें सक्तमजूरी! उभ्या आयुष्याची राख-रांगोळी! दुसरा कोणी असता तर त्याने हायच खाल्ली असती. पण वीर सावरकर म्हणजे मूर्तिमंत धैर्याचे महामेरू; त्यांनी ही शिक्षा स्तिथप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. सावरकरांची शिक्षा २४-२-१९११ ला सुरू झाली व ६-१-१९२४ रोजी त्यांना काही अटींवर मुक्त करण्यात आले. हा ग्रंथ म्हणजे या १४ वर्षांचा इतिहास आहे. अंदमानातील कैदीजीवन, क्रूर छळ, रक्त ओकायला लावणाया शिक्षा, तुरूंगाधिकारी व इतर कैदी यांचे वर्तन, खुद्द सावरकरांचे आचार-विचार यांचे विस्तृत वर्णन यात आहे. संपूर्ण निवेदन प्रथम पुरूषात व भाषा प्रवाही, तेजस्वी असल्याने वाचक गुंगून जातो. हा ग्रंथ केवळ अंदमानातील हाल-अपेष्टांचे हृदयद्रावक वर्णन करत नाही तर ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी हे कष्ट सोसले ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रेरणा देतो.
(१५ मे २०००)

सावरकर
Monday, April 21, 2008
युगान्त
"युगान्त" हे पुस्तक महाभारताकडे केवळ एक पुराणकथा या दृष्टीने न पाहता तो "जय" नावाचा प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, या दृष्टीकोनातून महाभारताचा वेध घेते. भीष्म, गांधारी, दूर्योधन, कर्ण,
कुंती, द्रौपदी, युधिष्ठीर, आणि अर्थातच श्रीकृष्ण या प्रमुख व्यक्तिरेखांची, मानसिक जडण-घडण, अतिशय तपशिलवार रीतीने वर्णन केलेल्या आहेत. या व्यक्ति अलौकिक असल्या तरी सामान्य माणसांप्रमाणेच त्यानाही राग-लोभ-मोह-क्रोधादि विकार असल्याचे आपल्याला दिसून येते.
तर्क-कठोर विचारसरणी, सखोल वैचारिक चिंतन व संदर्भासहीत मुद्दे, ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
लेखिका एक प्रख्यात मानव-वंश शास्त्रज्ञ असल्याने महाभारतकालीन सामजिक व्यवस्था, चाली-रीती याबद्दल आपल्याला बहूमोल माहिती मिळून जाते.
पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या विस्तृत वंशावली हा तर एक अनमोल खजिनाच आहे!
(३० जून २०००)
कुंती, द्रौपदी, युधिष्ठीर, आणि अर्थातच श्रीकृष्ण या प्रमुख व्यक्तिरेखांची, मानसिक जडण-घडण, अतिशय तपशिलवार रीतीने वर्णन केलेल्या आहेत. या व्यक्ति अलौकिक असल्या तरी सामान्य माणसांप्रमाणेच त्यानाही राग-लोभ-मोह-क्रोधादि विकार असल्याचे आपल्याला दिसून येते.तर्क-कठोर विचारसरणी, सखोल वैचारिक चिंतन व संदर्भासहीत मुद्दे, ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
लेखिका एक प्रख्यात मानव-वंश शास्त्रज्ञ असल्याने महाभारतकालीन सामजिक व्यवस्था, चाली-रीती याबद्दल आपल्याला बहूमोल माहिती मिळून जाते.
पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या विस्तृत वंशावली हा तर एक अनमोल खजिनाच आहे!
(३० जून २०००)
Labels:
mahabharat
स्वागत आहे!
नमस्कार!
आपले स्वागत आहे! मराठी ब्लॊग सुरू करायचे मूळ रविफने सहा महिन्यांपूर्वीच माझ्या डोक्यात पेरले होते, ते बीज आता या भर ऊन्हाळ्यात अंकुरले आहे.
"My मराठी" वर सबकुछ Marathi असेल... लेख, पुस्तक-परीक्षणें, इत्यादी, वगैरे...
सुरूवात तर केलीच आहे; पूढे कसे काय रेटता येते ते लवकरच समजेल!
आपला,
-गौतम

Subscribe to:
Posts (Atom)