"युगान्त" हे पुस्तक महाभारताकडे केवळ एक पुराणकथा या दृष्टीने न पाहता तो "जय" नावाचा प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, या दृष्टीकोनातून महाभारताचा वेध घेते. भीष्म, गांधारी, दूर्योधन, कर्ण, कुंती, द्रौपदी, युधिष्ठीर, आणि अर्थातच श्रीकृष्ण या प्रमुख व्यक्तिरेखांची, मानसिक जडण-घडण, अतिशय तपशिलवार रीतीने वर्णन केलेल्या आहेत. या व्यक्ति अलौकिक असल्या तरी सामान्य माणसांप्रमाणेच त्यानाही राग-लोभ-मोह-क्रोधादि विकार असल्याचे आपल्याला दिसून येते.
तर्क-कठोर विचारसरणी, सखोल वैचारिक चिंतन व संदर्भासहीत मुद्दे, ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
लेखिका एक प्रख्यात मानव-वंश शास्त्रज्ञ असल्याने महाभारतकालीन सामजिक व्यवस्था, चाली-रीती याबद्दल आपल्याला बहूमोल माहिती मिळून जाते.
पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या विस्तृत वंशावली हा तर एक अनमोल खजिनाच आहे!
(३० जून २०००)
No comments:
Post a Comment