Thursday, April 24, 2008

गंधाली

गंधाली
-रणजित देसाई
"स्वामी"कार रणजित देसाई यांचा हा ऐतिहासिक कथा-संग्रह. या "विराणी", "असा रंगला विडा", "अशी छेडिली तार", "अशी रंगली प्रीत" व "नक्षत्रकथा" या पाच कथा आहेत. पैकी, "विराणी" (सलीम-नूरजहान) व "अशी रंगली प्रीत"(बाजीराव-मस्तानी) या निखळ प्रेमकथा असून इतर कथांनाही प्रेमभावनेची तरल किनार आहे.
त्या-त्या ऐतिहासिक काळात चपखल बसणारी शब्दरचना, केवळ शब्दांनी व्यक्तीचित्र साकार करण्याची हातोटी व भावपूर्ण प्रसंग यामूळे वाचकाला आपण त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदारच आहोत असे वाटत राहते. टिपून ठेवावेत असे संवाद तर पानो-पानी आहेत.
ऐतिहासिक कथांची आवड असणाया वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे पंचपक्वान्नांची मेजवानीच आहे.
(१३ ऒगष्ट २०००)

1 comment:

Anonymous said...

स्वामी वाचले आहे. खरच संवाद खूप छान आहेत. रणजित देसाईंची लेखन शैली खूप छान आहे.