कर्ण - महाभारतातील एक अलौकिक व्यक्तीमत्व. महाभारतातील कुठलीच व्यक्तिरेखा सामान्य नाही; परंतु त्या सर्वांतही कर्ण आपला स्वतंत्र ठसा उमटवून जातो.वस्तुत: सूर्यपूत्र असलेल्या, पण आयुष्यभर सूतपूत्र म्हणून अवहेलना सहन करीत जगलेल्या कर्णाच्या जीवनावर ही कादंबरी आहे.
कादंबरीची शैली निवेदनात्मक आहे. कर्णमाता कुंती, कर्णबंधू शोण, कर्णपत्नी वृषाली, कर्णसखा दूर्योधन, श्रीकृष्ण व स्वत: कर्ण यांच्या निवेदनातून कर्णाचा जीवनपट व त्या बरोबरच महाभारतकथा उलगडत जाते.प्रासादिक, अलंकारांनी परीपूर्ण अशी भाषा व विलक्षण संवाद हा या कादंबरीच आत्मा आहे. लिहून ठेवावीत अशी चिंतनगर्भ वाक्ये पाना-पानावर आहेत. ती लिहून काढली तर तो एक अमूल्य असा साहित्यिक ठेवा बनेल.
कर्णाची चरीत-कहाणी सांगत असताना त्याच्या अवती-भवती असणाया व्यक्तिरेख रंगविण्यातही शिवाजीसावंत सफल झाले आहेत. त्यामुळे हा ग्रंथराज कुठेच एकसुरी झाल्यासारखे वाटत नाही. महाभारतकालीनभाषा, वेशभूषा, चालीरीती, समाजव्यवस्था, आदी गोष्टींबद्दल लेखकाने घेतलेले परीश्रम सहज कळून येतात.
आज "मृत्युंजय" हा मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानला जातो. ही कादंबरी न वाचलेल्या कोणत्याही मराठी वाचकाचे वाचन हे अपूर्णच मानावे लागेल.कर्णावर "मृत्युंजय" पूर्वी व नंतर बरेच लिखाण झाले आहे; पण ज्याप्रमाणे माधवराव पेशवे म्हटले की "स्वामी" आठवते, त्याचप्रमाणे कर्ण म्हटले की डोळ्यापूढे फक्त एकच नाव येते - मृत्युंजय!
१४ नोव्हेंबर २०००

8 comments:
आणि या महान कलाकृतीचे कठलेही पान उघडून वाचायला सुरुवात केली तरी चालते. कितीही वेळा वाचली तरी कंटाळा येत नाही.
yat vachu tevde kamich aahe
mrutyunjay vachatana kaddhich kantala yet nahi. karan yatun karna, kunti, shreekrushna, aani etaranchya manatil bhavana kalalya. mrutyunjay vachlyavar paristiti mansala kruti karayala bhag padte hyache dyan mala milale
कितीही वेळा वाचली तरी कंटाळा येत नाही.ही कादंबरी न वाचलेल्या कोणत्याही मराठी वाचकाचे वाचन हे अपूर्णच मानावे लागेल.
महाभारतातील कुठलीच व्यक्तिरेखा सामान्य नाही; परंतु त्या सर्वांतही कर्ण आपला स्वतंत्र ठसा उमटवून जातो.कर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं! कितीही वेळा वाचली तरी कंटाळा येत नाही.
वाचनाची अजिबात आवड नसलेला मी, "मृत्युंजय" हि माझ्या आयुष्यातील मी वाचलेली पहिली कादंबरी आहे. " मृत्युंजय " वाचतांना वेळेचे भानच नाही रहात.
कर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही !
MALA SAGLYAT JAST AVADLELI KADAMBARI AHE.KHARACH MANALA SPARSH KARUN JATE
Post a Comment